supreme-court_of_India

ज्या जातीत आपण जन्माला येतो ती जात लग्नानंतर बदलू शकत नाही – सुप्रीम कोर्ट

देश

supreme-court_of_India

ज्या जातीत आपण जन्माला येतो ती जात लग्नानंतर बदलू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय आरक्षणासंदर्भातील एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. सवर्ण समाजात जन्मलेल्या एका महिलेने मागासवर्गीय व्यक्तिबरोबर लग्न केल्यानंतर आरक्षणाचा फायदा घेत मागासवर्गीय कोट्यातून २१ वर्षांपूर्वी केंद्रीय विद्यालयात शिक्षिका म्हणून नोकरी मिळविली होती. तिच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
न्या. अरुण मिश्रा आणि एम. एम. शंतनागौदर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. संबंधित महिला ही अगरवाल कुटुंबात जन्मली असून ही जात सर्वसाधारण प्रवर्गात मोडते. मात्र, तिचा पती हा मागासवर्गीय समाजातील असल्याने तिला लग्नानंतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र कसे काय मिळू शकते, हे बेकायदा असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

या प्रकरणातील शिक्षिका वीस वर्षांच्या सेवेनंतर सध्या उपप्राचार्य पदावर कार्यरत होती. मात्र, ही शिक्षिका कथित उच्च जातीत जन्मलेली असताना मागासवर्गीय व्यक्तीबरोबर तिने लग्न केल्यानंतर तिची जात बदलू शकत नाही, त्यामुळे तिला आरक्षणाचे फायदे घेता येणार नाहीत, अशी तक्रार तिच्याविरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *