crime

गाडी लावण्याच्या वादातून संगणक अभियंत्याची हत्या

महाराष्ट्र

crime

गाडी लावण्याच्या वादातून एका संगणक अभियंत्याची हत्या करण्यात आली आहे. नेव्हल बत्तीवाला असे मृत मुलाचे नाव आहे. नेव्हल हा कोंढव्यातील लुल्लानगर परिसरात राहत होता. बत्तीवाला यांच्या बंगल्यासमोर टुरिस्ट गाड्या पार्क केल्या जात असत. यापूर्वीही वाहन मालकांमध्ये आणि नेव्हलमध्ये याच कारणावरून वाद झाले होते. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे टुरिस्ट गाड्या पार्क करण्यासाठी चालक आले असता त्यांच्यात वाद झाला. हा वाद टोकाला गेल्याने संतापलेल्या वाहनचालकाने हातात असलेल्या लोखंडी रॉडने नेव्हलवर वार केले. चालकासोबत असलेल्या त्याच्या दोन मित्रांनीही नेव्हलला मारहाण केली.या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नेवलला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.नेवलने यापूर्वी परदेशात संगणक अभियंता म्हणून काम केले असून तो दोन वर्षापूर्वीच भारतात आला होता. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *