7994

भारतीय बाजारपेठेत ऑडी Q5 लग्जरी कार लॉन्च

व्यापार

7994

भारतीय बाजारपेठेत आपली बहुप्रतिक्षीत ऑडी Q5 लग्जरी कार निर्माता कंपन्यांपैकी एक असलेल्या ऑडीने लॉन्च केली आहे.२.० लीटर डिझल इंजिन नव्या ऑडी Q5 मध्ये देण्यात आले आहे जे १९०PS ची पावर आणि ४०० एनएमचे टॉर्क जनरेट करते. ७ स्पीड ड्यूअल-क्लच गियरबॉक्ससोबत हे इंजिन देण्यात आलेले आहे. ऑडी Q5 चा टॉप स्पीड २१८ किमी प्रतितास असून गाडीला ० ते १०० किमी प्रतितासाचा वेग पकडण्यासाठी केवळ ७.१ सेकंदांचा अवधी लागतो. ही गाडी एका लीटरमध्ये १७.०१ किमीचा मायलेज देते.
नव्या ऑडी Q5मध्ये दोन्ही बाजूला एलईडी हेडलॅम्प्स आणि पुढील बाजुला हेक्सागनल ग्रिल देण्यात आली आहे. नवी ऑडी Q5 ही थोडी लांब आणि रुंदही आहे. ७ इंचाची इन्फोटेनमेंट स्क्रिन, थ्री झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग युनिट सारख्या सुविधा या गाडीत देण्यात आल्या आहेत. या कारची एक्स शो रुम किंमत ५३.२५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *