6e1b7ce8918c1243eb6cd4c2a0139393

दहावीत शिकणार्‍या १५ वर्षीय विद्यार्थ्याची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

महाराष्ट्र

6e1b7ce8918c1243eb6cd4c2a0139393

दहावीमध्ये शिकणार्‍या १५ वर्षीय विद्यार्थ्याने अज्ञात कारणावरून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उस्मानपुरा भागातील विवेकानंदपुरम येथे गुरूवारी रात्री घडली. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रज्वल विजय देसाई असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, प्रज्वल हा क्लोवरडेल शाळेत दहाव्या वर्गात शिकत होता. नेहमीप्रमाणे गुरूवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तो शाळेतून घरी आला. प्रज्वल घरी आला तेव्हा ७० वर्षीय वृद्ध आजी घरी होती. यानंतर तो अभ्यास करतो, असे आजीला सांगून वरच्या मजल्यावरील त्याच्या खोलीत गेला. चार वाजेच्या सुमारास त्याची आई शाळेतून घरी आली तेव्हा प्रज्वल कोठे आहे, असे त्यांनी आजीला विचारले. तेव्हा तो वरच्या खोली अभ्यासाला गेल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर त्याची आई त्याला शोधत वरच्या मजल्यावर गेली तेव्हा प्रज्वलच्या खोलीचे दार आतून बंद होती.
त्यांनी खिडकीतून आत डोकावून पाहिले असता प्रज्वलने छताच्या हुकला दोरी बांधून गळफास घेतल्याचे दिसले. यावेळी आईने हंबरडा फोडल्याने आजी आणि शेजारी तेथे धावले . या घटनेची माहिती उस्मानपुरा पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी प्रज्वलला खाली उतरवून बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले.
अपघात विभागातील डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांनी सोडविलेल्या प्रश्नपत्रिकेचे गुण सांगितल्या जात आहे. परीक्षेच्या टेन्शनमुळे त्यांने आत्महत्या केली असावी,असा संशय पोलिसांना आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *