national-bravery-award-for-children

प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांची घोषणा

देश

national-bravery-award-for-children

प्रजासत्ताकदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा देशभरातील १८ बालकांना हा पुरस्कार मिळाला आहे. पुरस्कारविजेत्या मुलांमध्ये नागालँडच्या चार, मिझोरामच्या आणि उडीशाच्या प्रत्येकी दोघांचा समावेश आहे.तर महाराष्ट्राच्या १७ वर्षीय नदाफ एजाज अब्दुल रौफचाही बाल शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या बालकांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. या वीर बालकांचा चमू प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्येही सहभागी होणार आहे. काही वर्षांपूर्वी मुलांचे पथक हत्तीवरुन राजपथावर यायचे, आता ते ओपन जीपमधून येतात. या पुरस्कारामध्ये पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कमेचा समावेश आहे. शिवाय पुरस्कार प्राप्त बालकांच्या पुढील शिक्षणाचा खर्च इंडियन काऊन्सिल फॉर चाईल्ड वेलफेअर या केंद्र सरकारच्या संस्थेमार्फत केला जातो.

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *