devgad-alphonso-hapus-mango-500x500

जगप्रसिद्ध देवगड हापूस आंबा महिनाभर उशिरा बाजारपेठेत येणार

कोकण

devgad-alphonso-hapus-mango-500x500

यंदा आंब्याच्या हंगामात सर्वात आधी बाजारात येण्याची ख्याती असलेला देवगडचा हापूस आंबा चक्क महिनाभर उशिरा येणार असल्यामुळे यंदा हापूस आंबा उत्पादकांना सुरवातीच्या मिळणाऱ्या दराचा फायदा होणार नाही.ओखी वादळाचा फटका देवगडच्या प्रसिद्ध हापूसला बसला आहे.
सध्या देवगड तालुक्यातील बहुतांशी हापूस आंब्यांच्या बागा आता फळधारणेच्या अवस्थेत असल्यामुळे हंगाम मार्चमध्येच सुरु होणार आहे. ऑक्टोबरपासून फेब्रुवारीपर्यंत आंब्याला तीन टप्प्यात मोहोर येतो. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये पहिला मोहोर, डिसेंबर, जानेवारीमध्ये दुसरा, तर फेब्रुवारीत तिसरा मोहोर येतो. जो मोहोर ऑक्टोबरमध्ये येतो तो आंबा साधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात बाजारात येतो.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *