TH22GST

जीएसटी काऊन्सिल छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा, हॅण्डीक्राफ्टच्या २९ वस्तूंवरील कर पूर्णपणे माफ

देश

TH22GST

जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून यात २९ हॅण्डीक्राफ्ट वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. तर ५३ प्रकारच्या सेवांवरील जीएसटी रद्द करण्यात आला आहे. याशिवाय ४९ इतर वस्तूंवरील कर कमी करण्यात आला आहे. या बैठकीत जवळपास ८० वस्तूंवरील जीएसटी कमी करण्यावर विचार करण्यात आला. जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीनंतर उत्तराखंडचे अर्थमंत्री प्रकाश पंत यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.

या बैठकीत पेट्रोल-डिझेलवर जीएसटी लागू करण्याबाबत विचार होईल अशी आशा होती. मात्र पेट्रोल-डिझेलच्या बाबतीत कोणताही निर्णय या बैठकीत घेण्यात आला नाही. या बैठकीत ज्या ४९ वस्तूवरील जीएसटी कपात करण्यात आला आहे, त्या वस्तूंवरील जीएसटी ५ ते १२ टक्के दरम्यान राहणार आहे. येत्या २५ जानेवारीपासून जीएसटी नवे दर लागू होणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. मात्र या बैठकीत जीएसटी भरणा प्रक्रिया सोपी करण्याबाबत कोणताही निर्णय होऊ न शकल्याने व्यापाऱ्यांची निराशा झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *