Rs-10

10 रूपयांचं नाणं पूर्णपणे वैध ते स्वीकारण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही – भारतीय रिझर्व्ह बॅंक

देश

Rs-10

10 रूपयांचं नाण्यांबाबत कोणाच्याही मनात काही शंका नसावी, हे पूर्णपणे वैध आहे असं आरबीआयने म्हटलं आहे.सामान्य माणूस आणि व्यापारी वर्गामध्ये 10 रूपयांच्या नाण्याबाबत विविध शंका आहेत. दहा रूपयांची नाणी वैध नाहीत अशाप्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पण दहा रूपयांची सर्व नाणी वैध असून कोणीही ती स्वीकारण्यास नकार देऊ शकत नाही असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. बाजारात 10 रूपयांची 14 प्रकारची नाणी उपलब्ध आहेत. वेळोवेळी ही नाणी आरबीआयकडून जारी करण्यात आली आहेत. या नाण्यांद्वारे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचं दर्शन होतं. यामुळेच बाजारात वेगवेगळ्या प्रकारची 10 रूपयांची नाणी पाहायला मिळतात.
आरबीआयने देशातील सर्व बॅंकांना 10 रूपयांच्या नाण्याबाबत निर्देश दिले आहेत. जनतेला 10 रूपयांच्या नाण्याबाबत विश्वास द्यावा आणि कोणत्याही भीतीविना 10 रूपयांच्या नाण्याचा व्यवहार करण्यास सांगावं असे निर्देश सर्व बॅंकांना दिले आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *