d518f09d0e6c78b38d13ec20af8d75f9

सुखोई विमानातून देशाच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांची भरारी

देश

d518f09d0e6c78b38d13ec20af8d75f9

देशाच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सुखोई विमानातून भरारी घेतली. हवाई दलाच्या जोधपूर विमानतळाहून त्यांनी सुखोई-30 एमएके या विमानातून उड्डाण केलं.त्या सुखोईतून उड्डाण करणाऱ्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत. यापूर्वी सुखोईतून माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनीही भरारी घेतली होती. संरक्षण मंत्र्यांच्या उड्डाणाची जबाबदारी ३१ स्वार्डन लॉयन यांच्याकडे होती. नुकतंच निर्मला सीतारमण यांनी आयएनएस विक्रमादित्यवर मिग-२९ या विमानातून उड्डाण केले होते.
संरक्षण मंत्रीपद स्वीकारल्यापासून निर्मला सीतारमण या जवानांना प्रोत्साहन देण्याचं काम करत आहेत. त्यांनी भारत-पाकिस्तान सीमा, भारत-चीन सीमेवर हजेरी लावली होती. त्यांनी अरुणाचल सीमेवर हजेरी लावली होती, त्यावेळी चीन सैनिकांनीही त्यांना अभिवादन केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *