share-market-3

शेअर बाजार पहिल्यांदा इतिहास रचत सेन्सेक्सचा 35 हजारांचा टप्पा पार

व्यापार

share-market-3

शेअर बाजारात बुधवारच्या दिवशी सकाळपासूनच चांगली तेजी पाहायला मिळाली. पहिल्यांदा इतिहास रचत सेन्सेक्सनं 35 हजारांचा टप्पा पार केला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीसुद्धा 10,760 हजारांपर्यंत गेला. यावेळी शेअर बाजार खरेदीदार वाढल्यानं मुंबई शेअर बाजारानं हा उच्चांक गाठला आहे. त्याप्रमाणेच आयटी कंपन्यांचं रेटिंग वाढल्याचाही शेअर बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून आला. दुपारी 3 वाजून 10 मिनिटांनी शेअर बाजारानं 312.89 अंकांची उसळी घेत 35,083पर्यंत पोहोचला. तर बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्येही 300 अंकांची वाढ झाली आहे. तसेच निफ्टीलाही 87.40 अंकांची मजबुती मिळाल्यानं तो 10,787पर्यंत गेला आहे. इन्फोसिस, टेक महिंद्रा, टीसीएस, एचसीएलसह दुस-या कंपन्यांचं टार्गेटही वाढवण्यात आलं आहे. आयटी रेटिंग वाढल्यामुळे शेअर बाजार वधारला आहे. बँकिंग, ऑटोमोबाईल क्षेत्रातील शेअर्सला याचा चांगला फायदा झाला. अॅक्सिस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, येस बँक सारख्या बँकांचे शेअर्स तेजीत आले होते.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *