1488139984-6075

अनाथ मुलांना शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गात 1 टक्का आरक्षण – राज्य सरकार

महाराष्ट्र

1488139984-6075

राज्य सरकारनं आज (बुधवार) अनाथ मुलांना शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये खुल्या प्रवर्गात 1 टक्का आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता शासकीय नोकरीतल्या अर्जावर जातीच्या रकान्यांसोबत आता अनाथ असाही रकाना असणार आहे. ज्यामुळे शासकीय नोकरीत 1 टक्के आरक्षण तर मिळेलच, शिवाय अनाथ मुलांसाठी आता जातीची कटकट राहणार नाही.
अनाथ मुलांना त्यांचा संस्थेतील कालावधी संपल्यानंतर खुल्या जगात वावरताना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषतः त्यांचा प्रवर्ग निश्चित नसल्याने शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती आणि लाभांपासून वंचित राहावे लागत होते. अनाथ मुलांच्या या समस्या ध्यानात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून देऊ, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला आणि त्याला मंजुरीही देण्यात आली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *