lunar-eclipse-sep-28-2015-deanne-fortnam-4

३१ जानेवारी चंद्र लाल रंगाचा,२० वर्षात एकदा येणारा दुर्मिळ योग

देश

lunar-eclipse-sep-28-2015-deanne-fortnam-4

३१ जानेवारी रोजी चंद्र लाल रंगाचा असेल. पण याचवेळी खग्रास चंद्रग्रहण असा २० वर्षात एकदा येणारा दुर्मिळ योगही आहे. खगोलप्रेमींसाठी २०१८ वर्षातील जानेवारी महिना पर्वणीचा आहे. कारण या महिन्यात दिसणारा चंद्र नेहमीप्रमाणे नसणार. खगोलप्रेमींना सुपरब्लू, ब्लू मूनसह चंद्रग्रहण आणि लाल चंद्रही पाहायला मिळणार आहे. खगोलीय भाषेत याला ‘ब्लड मून’ म्हटले जाते.पृथ्वीच्या कक्षेतून फिरताना चंद्र पृथ्वीच्या खूप जवळ पोहोचलेला असतो आणि त्याचवेळी चंद्रग्रहण झालं तर लाल चंद्राचा योग जुळून येतो. खगोल शास्त्रज्ञांनी याला ‘स्नो ब्लू सुपर रायझिंग, कॉपर टोटल लुनार एक्लिप्स’ असं नाव दिलं आहे.
३१ जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण आहे. भारतात हे चंद्रग्रहण अर्धच दिसणार आहे. सकाळी ६.२० वाजता चंद्र ग्रहणाला सुरुवात होईल.तर ९.३० वाजता ग्रहण पूर्णपणे सुटेल. खग्रास चंद्रग्रहण फक्त पॅसिफिक महासागरातून दिसणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *