hqdefault

मराठी सुप्रसिद्ध अभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज, रुग्णालयात उपचार सुरु

मनोरंजन

hqdefault

मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता विकास समुद्रे याला ब्रेन हॅमरेज झाल्याने मीरा रोड येथील भक्ती वेदांत रुग्णालयात विकासवर उपचार सुरु आहेत.गेल्या काही दिवसांपासून विकासला डोकेदुखीचा त्रास होत होता. त्यासाठी त्याने साधारण उपचारही घेतले होते. मात्र गेल्या ३ दिवासांपासून डोकेदुखीचा त्रास वाढल्याने विकासला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
विकास समुद्रे याने मराठीतील अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांमध्येही कामं केली आहेत. विनोदी अभिनेता म्हणून मराठी मनोरंजनसृष्टीत विकास सुप्रसिद्ध आहे. लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘फू बाई फू’मधील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली होती.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *