image5137363_web1_Crime-WEBlogo

दौंड तालुक्यात एकाच व्यक्तीने दोन ठिकाणी केलेल्या बेछूट गोळीबारात तिघांचा मृत्यू

महाराष्ट्र

image5137363_web1_Crime-WEBlogo

दौंड मध्ये आज एका माथेफिरूने केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.आज दुपारी दोनच्या सुमारास त्याने सुरुवातीला नगर मोरी चौकात गोळीबार केला. यात दोघांचा मृत्यू झाला. त्यानंतर १० ते १५ मिनिटांच्या अंतराने त्यानेच बोरावके नगरमध्येही अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला.
महत्वाची बाब म्हणजे गोळीबार करणारा संजय शिंदे नावाचा राज्य राखीव पोलीस दलाचा कर्मचारी आहे. या माथेफिरुने केलेल्या गोळीबारात अमोल जाधव, गोपाळ शिंदे आणि प्रशांत पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
दरम्यान, हा माथेफिरु त्याच्या घरी जाऊन बसला असून, पोलिसांनी त्याच्या घराला वेढा दिला आहे. मात्र, शिंदे यांने गोळीबार का केला? याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *