149090.3

अंडर १९ वर्ल्डकप टीम इंडियाचा संघाचा पापुआ न्यू गिनीया संघावर १० विकेट्सने मात

क्रीडा

149090.3

भारताने सलग दुसरा विजय मिळवत पापुआ न्यू गिनीया संघावर १० विकेट्सने मात केली. मुंबईचा पृथ्वी शॉ हा या संघाचा कर्णधार असून त्याने दमदार खेळी करत हा विजय खेचून आणला आहे. याआधी ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या सामन्यात त्याने ९४ रन्सची दमदार खेळी केली होती. टॉस जिंकून कर्णधार पृथ्वी शॉ याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पपुआ न्यू गिनीया संघाला ६४ रन्सवर ऑलआऊट केले. नंतर या टार्गेटचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने एकही विकेट न गमावता हा सामना जिंकला. टीम इंडियाने पपुआ न्यू गिनी संघाला २१.४ ओव्हर्समध्ये केवळ ६४ रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने केवळ ८ ओव्हर्समध्ये ६७ रन्स करत हा विजय मिळवला. पृथ्वी शॉ याने केवळ ३९ बॉल्समध्ये १२ फोर लगावत ५७ रन्स केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *