road-accident

झारखंडमध्ये भीषण अपघात ट्रक आणि रिक्षेच्या धडकेत ११ जण जागीच ठार

देश

road-accident

झारखंडमधील गुमला जिल्ह्यात भीषण अपघात झाला. ट्रक आणि रिक्षेच्या झालेल्या धडकेत ११ जण जागीच ठार झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग २३ वर ही भीषण दुर्घटना घडली आहे. मृतांमध्ये ५ महिला, ४ लहान मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुक्यामुळे चालकाला वाहन चालवण्यात अडथळा निर्माण झाल्याने हा अपघात घडला आहे.
तर या दुर्घटनेत अनेक जण गंभीर स्वरुपात जखमी झाले आहेत. जखमींवर रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्युट ऑफि मेडिकल सायन्स येथे दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *