pawan-hans_660_120213083658

ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारं डाऊफिन एएस 365 एन3 हेलिकॉप्टर गायब

मुंबई

pawan-hans_660_120213083658

ओएनजीसीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारं डाऊफिन एएस 365 एन3 हे हेलिकॉप्टर गायब झाले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये दोन वैमानिकांसह ओएनजीसीचे पाच कर्मचारी प्रवास करत होते. ह्या हेलिकॉप्टरने सकाळी 10 वाजून 20 मिनिटांनी जुहू इथून उड्डाण केलं होते. हेलिकॉप्टर सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी ओएनजीसीच्या समुद्रातील लॉन्चपॅडवर पोहोचणं अपेक्षित होतं. परंतु समुद्रात 30 नॉटिकल मैल अंतरावर असताना हेलिकॉप्टरचा सकाळी 10.35 वाजता संपर्क तुटला. मात्र, आता हे हेलिकॉप्टर डहाणूजवळ समुद्रात कोसळल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, या हेलिकॉप्टरचे अवशेष नौदलाला या ठिकाणी आढळून आले आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *