modi3-kSKE--621x414@LiveMint

आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कपड्यांबाबत मोठा खुलासा !

देश

modi3-kSKE--621x414@LiveMint

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे कपडे हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण त्यांच्या या कपड्यांचा खर्च नेमका कसा होतो याची माहिती आता उघड करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी यांच्या कपड्यांचा खर्च हा त्यांच्याच पगारातून केला जातो. यासाठी सरकारी कार्यालयाकडून कोणताही खर्च नाही होत. एका मीडिया रिपोर्टनुसार आरटीआय कार्यकर्ता रोहित सब्बरवाल यांनी आरटीआय अंतर्गत ही माहिती मागितली होती.सब्बरवाल अनेक काळापासून आरटीआय टाकत होते. याआधी त्यांनी अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंह यांच्या वैयक्तीक खर्चाबाबत ही माहिती मागितली होती. सब्बरवाल यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात (19 मार्च 1998 ते 22 मे 2004 मध्ये) प्रत्येक वर्षी वाजपेयींच्या कपड्यांवर होणारा खर्च याची माहिती मागितली होती. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात (22 मे 2004 ते 26 मे 2014) त्यांच्या कपड्यांच्या खर्चाबाबत देखील माहिती मागितली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर आतापर्यंतचा खर्च आरटीआयमधून मागवण्यात आला. पंतप्रधान कार्यालयने म्हटलं की, पीएम मोदी यांच्या कपड्यांवर होणार खर्च हा मोदी त्यांच्या पगारातून खर्च करतात.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *