aapla-manus-et00068204-25-12-2017-02-16-10

‘आपला मानूस’चा पहिला टीझर लाँच

मनोरंजन

aapla-manus-et00068204-25-12-2017-02-16-10

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनची निर्मिती असलेला पहिला मराठी चित्रपट ‘आपला मानूस’चा टीझर रीलिज झाला आहे. अभिनेते नाना पाटेकर या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.नाना पाटेकर क्राईम ब्रँचमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षक मारुती नागरगोजे ही व्यक्तिरेखा साकारत आहेत.
आपल्या वडिलांसोबत राहणाऱ्या एका तरुण जोडप्याची ही कथा आहे. शहरी जीवन आणि नात्यांची गुंतागुंत यामध्ये अडकलेल्या पित्याची ही कहाणी आहे. एका अनपेक्षित घटनेमुळे त्यांना आयुष्य आणि कुटुंबाविषयीच्या धारणांवर प्रश्न उपस्थित करण्याची वेळ येते.
अजय देवगनने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर ‘आपला मानूस’चा पहिला लूक शेअर केला होता. येत्या ९ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
‘आपला मानूस’चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे हे असून, नाना पाटेकरसोबत सुमीत राघवन, इरावती हर्षे या चित्रपटात झळकणार आहेत.

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *