narayan-rane

नारायण राणे यांची औरंगाबाद येथील सभा तूर्तास पुढे

महाराष्ट्र राजकीय

narayan-rane

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची रविवार,दि.७ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे होणारी जाहिर सभा पुढे घेणार असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस,माजी खासदार निलेश राणे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष संघटना बांधणीसाठी नारायण राणे यांनी राज्याचा दौरा सुरु केला असून या दौऱ्याची सुरुवात ऐतिहासिक करवीर नगरीतून झाली.

कोल्हापुर,सांगली,आणि सातारा जिल्हायांचा दौरा करुन नारायण राणे मराठवाडा दौऱ्यावर ७ जानेवारीपासून जाणार होते. परंतु भीमा-कोरेगाव प्रकरणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने राज्यात अनेक ठिकाणी जमावबंदी आदेश लागु केला आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनीही आपला मराठवाडा दौरा स्थगित केला असून दौऱ्याची पुढील तारीख लवकरच जाहिर करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस, माजी खासदार निलेश राणे यांनी दिली.

Sarsoli Live Cricket Streaming

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *