1435180638

१ जानेवारीपासून पंढरपूरच्या विठोबाचा प्रसाद महागला!

महाराष्ट्र

1435180638

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने १ जानेवारीपासून बुंदी लाडू प्रसादाच्या किमतीमध्ये पाच रुपयांनी वाढ केली आहे. विठुरायाच्या दर्शनानंतर भक्तांना मंदिरातून मिळणाऱ्या प्रसादरूपी लाडूची किंमत दीडपटीनं वाढवण्यात आली आहे. लाडू बनविण्यासाठी बाहेरील संस्थेस ठेका दिल्यामुळं ही दरवाढ झाली असून या निर्णयाबद्दल भाविकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

विठुरायाच्या दर्शनासाठी येणारे गोरगरीब भाविक येथील मंदिरातून प्रसाद म्हणून बुंदीचा लाडू गावाकडं घेऊन जातात. पूर्वी प्रसादाच्या दोन लाडूचे पाकीट दहा रुपयाला मिळत असे. यंदापासून या पाकिटाची किंमत १५ रुपये झाली आहे. मंदिराच्या विकासासाठी व भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी देत असताना भाववाढ का, असा संतप्त सवाल केला जात आहे.

milestones
Global Kokan Festival 2018

 

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *