1837_India

केपटाऊन भारतीय संघ उन्हाने हैराण, दोनच मिनिटांत आंघोळ उरकरण्याचा आदेश

क्रीडा

1837_India

दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर असणा-या भारतीय क्रिकेट संघाला मालिका सुरु होण्याआधीच अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मैदानाच्या स्टाफला उन्हामुळे वेगवान पिच तयार करण्यासाठी समस्या येत होती. शहरातही वाढत्या तापमानामुळे पाण्याची कमतरता भासतेय. यातच टीम इंडियालाही पाणी वाचवण्याचे आदेश देण्यात आलेत. हे आदेश केवळ टीम इंडियालाच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेच्या टीमसह संपूर्ण केपटाऊन शहराला देण्यात आलेत.
या आदेशाचे पालन करणे तितकेसे शक्य नाही. खासकरुन खेळाडूंना. आंघोळीसाठी वापरला जाणारा शॉवर दोन मिनिटांहून अधिक वापरु नये असे आदेश खेळाडूंना देण्यात आलेत.
केपटाऊनमध्ये दुष्काळ पडलाय. त्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई भासतेय. शहरातील एका व्यक्तीला केवळ ८७ लीटर पाणी प्रतिदिन अथवा महिन्याला १० हजार लीटर पाणी वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे.

IMG-20171229-WA0000
Global Kokan Festival 2018

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *