aadhar-card-875

सावधान ! तुमचे आधार कार्ड सुरक्षित का

देश

aadhar-card-875

तुमचे आधार कार्ड पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यातील माहिती चोरणे अशक्य असल्याचा दावा एकीकडे केंद्र सरकारने केला होता. पण, हा दावा पूर्णपणे फोल ठरला आहे . कारण ५०० रुपयांत देशातल्या कोट्यवधी लोकांच्या आधार कार्डची माहिती अगदी सहज उपलब्ध होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
‘द ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ही धक्कादायक बाब समोर आली आहे. काही दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल होत होता. या मेसेजच्या माध्यामातून ५०० रुपयांत १०० कोटी आधार कार्डचा अॅक्सेस आपल्याला मिळाला असल्याचे या वृत्तपत्राने म्हटले आहे.
यामुळे आधार कार्डमधील माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. UIDAIनं ह्या रिपोर्टला चुकीचं म्हटलं आहे. रिपोर्टमध्ये आसा दावा करण्यात आला आहे की, फक्त ५०० रुपयात भारतातील सर्वच आधारकार्ड धारकांची माहिती मिळू शकते. द ट्रब्यूनच्या त्या पत्रकारानं सॉफ्टवेअर तयार करणाऱ्याला एका एजंटद्वारे संपर्क केला. त्याला पेटीएमद्वारे पैसे पाठवले. त्यानंतर १० मिनीटात लगेत एका व्यक्तीनं एक लॉगइन आईडी आणि पासवर्ड दिला. त्याद्वारे पोर्टलवर कोणत्याही आधारकार्डची माहिती मिळू शकते.तसेच अतिरिक्त ३०० रुपये दिल्यास उपलब्ध माहितीची प्रिंट काढण्याचा अॅक्सेसही मिळतो अशी आणखी एक धक्कादायक बाब त्यांनी उजेडात आणली.

dance1
Global Kokan Festival 2018
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *