18895554789_9d5e05023c_b

अलिबाग सांबरी गावातील लोकांनी रुणानुबंध जपत एसटी बसचा केला वाढदिवस साजरा

कोकण

18895554789_9d5e05023c_b

अलिबाग तालुक्यातील सांबरी गावातील लोकांनी हाच रुणानुबंध जपत गावात आलेल्या एसटी बसचा वाढदिवस साजरा केला.ग्रामिण भागात आजही एसटी बसशी जोडलेला प्रवाशांचा जिव्हाळा कायम आहे.
सांबरी अलिबाग तालुक्यातील शेवटच्या टोकावरच गाव, जिथे रस्ते वीज पाणी यासारख्या मुलभुत सुविधांची वानवा होती. वाहतुकींची साधनंही नव्हती. अशा काळात गावातील कामा निमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या लोकांच्या सोयीसाठी एस टी महामंडळाने सांबरी ते परळ ही बससेवा सुरु केली.
आज या घटनेला तब्बल २५ वर्ष पुर्ण झाली. एसटी महामंडळाने सांबरी ते परळ ही बससेवा अव्याहतपणे आहे. आज गावात चांगले रस्ते आहेत, वाहतुकीची नवीन साधनेही आहेत. पण गावकरम्य़ांचे एसटीच्या बससेवेशी जोडले गेलेले रुणानुबंध कायम आहेत. याचीच जाण ठेऊन, गावकऱ्यांनी एकत्र येत आज एसटीचा २५ वा वाढदिवस साजरा केला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *