hsc-exam759-620x345

अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी 19 मे रोजी

महाराष्ट्र

hsc-exam759-620x345

नववर्षाच्या सुरूवातीलाच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या सीईटीच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशाचे योग्य नियोजन करणे शक्‍य होणार आहे. त्यामुळे सीईटीची तयारी करण्यास विद्यार्थ्यांना बराच कालावधी मिळणार आहे. सध्या सीईटीच्या गुणांवरून विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्‍चित केले जाते. त्यामुळे सीईटीचे महत्त्व वाढले आहे. विद्यार्थ्यांन वार्षिक किती गुण मिळाले, यापेक्षा सीईटी चांगले गुण मिळविणे महत्त्वाचे आहे. त्यावरूनच चांगल्या महाविद्यालयात प्रवेशाची संधी उपलब्ध होणे शक्‍य होणार आहे.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी सीईटी दि. 19 मे रोजी होणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमात एमबीए, एमसीए, एलएलबी, आर्किटेक्‍चर, हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र, इंटिग्रेडेट कोर्सेसचा समावेश होता. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलमार्फत घेतली जाते.

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *