Arrival-of-shree-patel-1

१ जानेवारी जन्मलेल्यांना मुलींना मिळणार ५ लाख रुपये

देश

Arrival-of-shree-patel-1

मुलींची संख्या वाढवण्यासाठी कर्नाटकातील बंगळुरूत १ जानेवारी रोजी जन्माला येणारी मुलगी ‘लक्ष्मी’च्या पावलानं घरी येणार आहे. कर्नाटकातील बंगळुरू महापालिका रुग्णालयात १ जानेवारी रोजी जन्माला येणाऱ्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून तब्बल पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. नववर्षाच्या १ तारखेला बंगळुरू महापालिकेच्या रुग्णालयांत मुलगी जन्माला आल्यास तिच्या भविष्यासाठी प्रशासनातर्फे पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत.
मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या शिक्षणाचा महत्त्व लक्षात घेता बंगळूरू सरकारने हा निर्णय घेतला आहे. बंगळूर महापालिकेच्या रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलीस ही रक्कम मिळणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *