electricity

लोणावळा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले १६ हॉटेल्सचा वीज व पाणी पुरवठा खंडीत

महाराष्ट्र

electricity

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने लोणावळ्यातील सर्व हॉटेल्समध्ये सांडपाणी प्रक्रिया यंत्र बसवण्याच्या सूचना दीड वर्षापूर्वीच दिल्या होत्या. तसेच याबाबत जागृती करुन बैठका घेऊन कारवाईचा इशारा दिला. त्यानंतरही हॉटेल प्रशासनाची कोणतीही हालचाल नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटिसाही बजावल्या होत्या. मात्र या नोटिसा हॉटेल्स प्रशासनाने फारशा गांभीर्याने घेतल्या नाहीत. त्यामुळेच नववर्षाचे स्वागत करण्यासाठी लोणावळ्यात पर्यटक दाखल झालेले असतानाच १६ हॉटेल्सचा वीज आणि पाणी पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.लोणावळा आणि खंडाळा परिसरात १२५ हॉटेल्स आहेत. पैकी ६५ हॉटेल्सना गेल्या काही महिन्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *