262988-fire2

मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये अग्नी तांडव,१४ जणांचा मृत्यू

मुंबई

262988-fire2

मुंबईच्या लोअर परळ येथील कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू झाला.आगीत जखमी झालेल्यावर परेलच्या केईएम व सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हॉटेल मोजो बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबला गुरुवारी रात्री १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली.
आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही, मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आठ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि सहा पाण्याच्या टँकर्सच्या मदतीने, तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र आगीत हॉटेलसह शेजारी असलेल्या बँका, कार्यालयांचं मोठं नुकसान झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *