पश्‍चिम, मध्य रेल्वेच्या थर्टीफर्स्टसाठी विशेष लोकल

मुंबई

_3ba9e610-a28e-11e7-ab18-a47b6e18222b

पश्‍चिम आणि मध्य रेल्वे 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विशेष लोकल चालवणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचा परतीचा प्रवास चांगला व्हावा यासाठी मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल मार्गावर चार विशेष लोकल; तर पश्‍चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरारदरम्यान आठ विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.
मध्यरात्रीपासूनच विशेष लोकल फेऱ्या
तर पश्चिम आणि मध्य रेल्वेकडूनही ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच विशेष लोकल फे-या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चर्चगेट ते विरार, कल्याण ते सीएसएमटी अशी लोकल असणार आहेत.

सीएसएमटी ते पनवेल विशेष लोकल
हार्बरवरही लोकल सोडण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते पनवेल अशा बारा विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. नववर्षाच्या स्वागतादरम्यान प्रवाश्यांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे..

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *