699699796Alibaug_Beach_Main

नववर्षांच्या स्वागतासाठी रायगडमध्ये मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल

कोकण

699699796Alibaug_Beach_Main

नववर्षांच्या स्वागतासाठी रायगडमध्ये मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. अलिबाग, मुरुड, दिवेआगर, किहीम, मांडवा, नागाव, आक्षी, रेवदंडा हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन समुद्र किनारे पर्यटकांनी गजबजून गेले आहेत. या पाश्र्वभुमीवर रायगड पोलीस दलाने विशेष खबरदारी घेतली आहे. पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. तळीराम वाहन चालकांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत. सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांच्या तीन स्पीड बोटी रात्र-दिवस गस्ती ठेवण्यात येणार आहेत.
अलिबाग आणि मुरुड परिसर येथे मुंबईकरांची मोठी गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. ३० आणि ३१ डिसेंबर या दोन तारखांसाठी जिल्ह्य़ातील बहुतांश हॉटेल्स, लॉजेस आणि रिसॉर्ट्सवर शंभर टक्के बुकिंग झाले आहे.पर्यटकांना आकर्षति करण्यासाठी ठिकठिकाणी न्यू ईअर सेलिब्रेशन पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. हॉटेल व्यावसायिकांनी ऑर्केस्ट्रा, डीजे नाइट्स, गाला डान्स, सेलिब्रिटी नाइट्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *