263011-263002-pubfire61

कमला मिल कंपाऊंड अग्नितांडवा ! पंतप्रधान मोदी,राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख

मुंबई

263011-263002-pubfire61

मुंबईतील लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू झाल्याबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनीही या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
मुंबईमधील आगीची बातमी धक्कादायक आहे. ज्यांनी या आगीत जीव गमावला आहे त्यांना श्रद्धांजली अर्पण करतानाच जे यामध्ये जखमी झाले आहेत त्यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो अशी इच्छा व्यक्त करतो अशा आशयाचे ट्विट राष्ट्रपतींच्या ट्विटर अकाऊंण्टवरून ट्विट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या अग्नितांडवात जीवाची पर्वा न करता आगीत अडकलेल्यांची सुखरुप सुटका करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांची आणि बचावकार्यात सहभागी असणाऱ्या पोलिस दलातील जवांनाच्या धाडसाची राष्ट्रपतींने प्रशंसा केली आहे.
मुंबईतील आगीची बातमी पाहून व्याकूळ झालो. या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. जखमीं लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांनीही यावर दु:ख व्यक्त करत महापालिका आयुक्तांना सखोल चौकशीचे आदेश दिले असल्याचे यावेळी सांगितले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *