sbi_1488576027

एसबीआय कर्मचाऱ्यांना घरातील व्यक्तिंचे निधन झाल्यास मिळणार सात दिवसांची रजा

देश

sbi_1488576027

भारतात पहिल्यांदाच सरकारी बँक आपल्या कर्मचाऱ्यांना अशी रजा मंजूर करणार आहे. एसबीआयने लागू केलेल्या या नियमामुळे जर एखाद्या कर्मचाऱ्याच्या घरातील सदस्याचे निधन झाले तर त्या कर्मचाऱ्याला सुट्टी घेता येणार आहे. या नियमांतर्गत ७ दिवसांची रजा घेता येणार असून ही सुट्टी भरपगारी असणार आहे.यामुळे कर्मचाऱ्यांना दुःखाच्या वेळी आपल्या घरातील सदस्यांसोबत वेळ घालवता येईल. घरातील सदस्यांमध्ये पत्नी, आई-वडिल, सासु-सासरे आणि मुलांचा समावेश होईल. अशा दुःखाच्या क्षणी या सुट्ट्यांचा लाभ बँकेतील कर्मचारी घेऊ शकतील.
याव्यतिरिक्त एसबीआय आपल्या कर्मचाऱ्यांना अजून काही सुविधा देणार आहे. एसबीआयचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँक २०००० रुपयापर्यंतच्या मासिक निवृत्तीवेतन मिळणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मेडिक्लेमच्या प्रीमियममध्ये ७५ टक्क्यांची सब्सीडी देणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *