Global Kokan

‘कोकण भूमी प्रतिष्ठान’च्यावतीने वाशी येथे सहाव्या ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’चे आयोजन

महाराष्ट्र मुंबई व्यापार

कोकणामधील व्यापार आणि पर्यटन संधींचा प्रचार करण्यासाठी ‘कोकण भूमी प्रतिष्ठान ‘च्या वतीने सहाव्या ‘ग्लोबल कोकण महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ६ ते १० जानेवारी दरम्यान वाशी नवीमुंबई येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेंशन सेंटरमध्ये होणाऱ्या या महोत्सवाचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू हे स्वागताध्यक्ष आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. अन्य तपशील www.globalkokan.org वर उपलब्ध आहे. ३ ते ४ लाख लोकांचा महोत्सवात सहभाग अपेक्षित आहे. याबाबत सुरेश प्रभू यांनी सांगितले की, कोकणात पर्यटन, मत्स्य,शेती,बंदर आदी क्षेत्रांत विकासाच्या अनेक संधी आहेत. यातून कोकणात असंख्य उद्योगनिर्मिती होऊ शकेल. कोकणातील तरुणांनी गावात प्रकल्प उभे करावेत याकरिता शासनाचे विविध विभाग, बँका,तज्ज्ञ हे सहकार्य करू शकतील. या सर्वांना एकाच व्यासपीठावर आणण्याकरिता महोत्सव उपयोगी ठरेल.

Global Kokan

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *