_b25fc50e-7ad4-11e7-b40f-35ec362abc1c

३१ डिसेंबर, नववर्ष स्वागतासाठी मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर बेस्टच्या जादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय

मुंबई

_b25fc50e-7ad4-11e7-b40f-35ec362abc1c

नववर्षाच्या स्वागतासाठी प्रवाश्यांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. नववर्ष स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि मुंबईतील इतर ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर,चौपाटीवर रात्रीच्या वेळी फिरायला जाणाऱ्या प्रवांशाच्या सोयीसाठी बसमार्ग क्र. ७ मर्यादित, १११, ११२, २०३, २३१, २४७ आणि २९४ या बससेवेच्या रात्री १०. ०० वाजल्यापासून एकूण २० जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.
तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वेकडूनही ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासूनच विशेष लोकल फे-या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चर्चगेट ते विरार,कल्याण ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते पनवेल अशा बारा विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *