kotak-mahindra-bank-2-g-block-connaught-place-1024x520

मुलुंड, कोटक महिंद्रा बँक एटीएम प्रकरण,आरोपी पकडण्यात नवघर पोलिसांना यश !

मुंबई

kotak-mahindra-bank-2-g-block-connaught-place-1024x520

मुलुंडमधील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम घोटाळ्याप्रकरणी नवघर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद केली आहे.पंधरा दिवसांपूर्वी मुलुंडच्या एटीएममधून एटीएमचा डेटा चोरून मुंबईतल्या अनेक जणांना गंडा घालणाऱ्या एका परदेशी दाम्पत्याला पकडण्यात मुलुंडच्या नवघर पोलिसांना यश आलं. देशाची राजधानी नवी दिल्लीमधून याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतल आहे.
मुलुंड येथील एटीएममध्ये सीसीटीव्ही लावून पासवर्ड हॅक करण्यात आला होता. त्याच्यामाध्यमातून जवळपास २० लाखांहून अधिक रक्कम काढण्यात आली होती.

मुलुंड पूर्वेच्या कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममधून पैसे काढलेल्या जवळपास ४३ जणांना लाखो रुपयांचा फटका बसला.

एटीएममधून पैसे काढून गेल्यानंतर, एसएमएस आला. पण त्यानंतरही चार-पाच तासांनी पुन्हा अकाऊंटमधून पैसे गेल्याचं समोर आलं. हा प्रकार एक-दोघांबाबत घडला नाही, तर तब्बल ४३ जणांना याचा फटका बसला आहे.

१७ आणि १८ डिसेंबर दरम्यान अनेकांना हा फटका बसल्याने, पीडितांनी नवघर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *