lpg

केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, दर महिन्याला एलपीजी सिलेंडरचे दर वाढविण्याचा निर्णय अखेर मागे

देश

lpg

जून २०१६ मध्ये सरकारनं एलपीजी गॅसच्या किंमतीत दर महिन्याला ४ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. मार्च २०१८ पर्यंत सिलेंडरवरील अनुदान पूर्णपणे संपवण्याच्या इराद्यानं हा निर्णय घेण्यात आला होता.पण आता प्रत्येक महिन्याला अनुदानित एलपीजी सिलेंडरमध्ये ४ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय अखेर केंद्र सरकारनं मागे घेतला आहे. हा निर्णय उज्ज्वला योजनेच्या विपरीत असल्याची जाणीव सरकारला झाल्यानं तो मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. उज्ज्वला योजनेत गरीबांना मोफत गॅस जोडणी देण्यात येईल अशी तरतूद आहे.
देशात जवळजवळ १८.११ कोटी एलपीजी ग्राहक आहेत. जे अनुदानित सिलेंडर खरेदी करतात. त्यापैकी ३ कोटी गरीब महिलांचाही समावेश आहे. ज्यांना उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस जोडणी देण्यात आली आहे. याशिवाय २.६६ कोटी लोकांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला साथ देत आपली गॅसवरील सब्सिडी सोडली आहे.

दरम्यान, एका वर्षात एका कुटुंबासाठी १२ अनुदानित सिलेंडर मिळतात. पण यापेक्षा जास्त सिलेंडर हवे असल्यास ते बाजारभावानं खरेदी करावे लागतात.

पण आता सिलेंडरच्या दरात प्रत्येक महिन्याला दर न वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *