c

राज्यात आजपासून मौखिक आरोग्य तपासणी मोहीम – आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत

महाराष्ट्र

c

राज्यात १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत मौखिक आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. १ डिसेंबर सकाळी ११.३० वाजता मालवणी मालाड येथील सामान्य रुग्णालयातून या अभियानाला सुरुवात होणार आहे.या कालावधीत संपूर्ण राज्यात ३० वर्षावरील स्त्री व पुरुषांची मौखिक तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी सर्व शासकीय, महापालिका, नगरपालिका दवाखाने येथे मोफत उपलब्ध असणार आहे. तसेच गाव पातळीवर ही तपासणी एएनएम व एमपीडब्लू यांच्यामार्फत करुन गरजू लोकांना पुढील उपचारासाठी नजीकच्या दवाखान्यात पाठविण्यात येणार आहे. यामध्ये उपचार हे पूर्णत: नि:शुल्क असणार आहेत.
ही मोहीम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था जसे इंडियन डेंटल असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, इंडियन कॅन्सर सोसायटी, लायन्स, रोटरी क्लब तसेच शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालये सहकार्य करणार आहेत.विशेष सहकार्य टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथील तांत्रिक तज्ज्ञ डॉक्टर करणार आहेत.
लोकांनी या मोहीमेत सहभागी होऊन मौखिक तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी केले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *