0Mirabai_Chanu

भारताच्या मीराबाई चानूला सुवर्णपदक

क्रीडा

0Mirabai_Chanu

भारताच्या मीराबाई चानू हिने जागतिक विक्रमासह जागतिक वेटलिफ्टिंग अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. कर्णम मल्लेश्‍वरीनंतर अशी कामगिरी करणारी मीराबाई केवळ दुसरीच वेटलिफ्टर ठरली. ४८ किलो वजन गटात तिने स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो वजन उचलून हा पराक्रम केला.भारोत्तोलन स्पर्धेत पदकाची कमाई करणारी ती दुसरी भारतीय महिला ठरली आहे. २२ वर्षांपूर्वी कर्णम मल्लेश्वरीने विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिप स्पर्धेत अशी कामगिरी केली होती.
गेल्या वर्षी रियो ऑलिंपिक स्पर्धेत मीराबाईची कामगिरी निराशाजनक झाली होती. त्या वेळी ४८ किलो वजनी गटात ती सर्वांगीण किमान कामगिरीपर्यंतही पोचू शकली नव्हती. क्‍लीन अँड जर्क प्रकारात ती तीन प्रयत्नांत साधे वजनही उचलू शकली नव्हती.
सुवर्ण विजेती भारोत्तोलक साइखोम मीराबाई चानू हिचे राष्टपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *