Pune_ATM-452x395

पुण्यात एटीएम सेंटर जळून खाक

महाराष्ट्र

Pune_ATM-452x395

पुण्यातल्या वारजे गणेश माथ्याजवळच्या परिसरात हे एटीएम आहे. मध्यरात्री दोन वाजता एक इलेक्ट्रिक दुकान आणि दुकानातच असलेलं एटीएम केंद्र आगीत जळले असून या आगीत एटीएम सेंटरमधील लाखो रुपयांची रोकड जळून खाक झाली आहे. ही आग रात्रभर धुमसत होती. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी, एटीएममध्ये असलेली सर्व रोकड जळून खाक झाली आहे. ही रक्कम नेमकी किती होती, याबाबत अद्याप समजू शकलेलं नाही.
शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *