gavel

जात वैधता प्रमाणपत्र, रक्ताच्या नात्याकडील व्यक्तीचा प्रमाणपत्र पुरावा मानणार

महाराष्ट्र

gavel

आता रक्ताच्या नात्यातील एकाचे जात प्रमाणपत्र वैधतेसाठी पुरे ठरणार असून एका महिन्याच्या आता जात प्रमाणपत्र देणे बंधनकारक असणार आहे.राज्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास वर्गासाठी त्यांना शासकीय सेवातील तसेच शिक्षणातील आरक्षित जागांचा लाभ मिळण्यासाठी जातीच्या दाखल्याबरोबर जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.परंतु वैधता प्रमाणपत्र मिळणे महामुश्कील होऊन बसले आहे. १९५० ते १९६७ पूर्वीचे जातीचे पुरावे सादर करणे अवघड जाते. परिणामी वर्ष-दोन वर्षे प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे मागास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशात अडचणी येतात. त्यांना शिष्यवृत्ती, शुल्क सवलतही मिळत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होते.
रक्ताच्या नात्यातील कोणत्याही एका व्यक्तिकडे असलेले जात वैधता प्रमाणपत्र यासाठी पुरे ठरणार आहे. यासंदर्भातील राजपत्र प्रसिद्ध करण्यात आलेय. याबाबत सामाजिक न्याय विभागाने एक अधिसूचना जारी केली आहे. जात वैधता प्रमाणपत्र यापुढे एक महिन्याच्या आत देणे बंधनकारक असून त्याचबरोबर वडील किंवा वडिलांकडील रक्ताच्या नातेवाईकांकडील जात वैधता प्रमाणपत्र हा एकमेव पुरावा ग्राह्य धरला जाणार आहे. त्यानुसार त्यांच्या पाल्यांना वैधता प्रमाणपत्र देण्याची तरतूद संबंधित नियमांमध्ये करण्यात आली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *