g

गोदावरी खोरे एकात्मिक जल आराखड्यास मान्यता

महाराष्ट्र

g

गुरुवारी मुंबईत राज्य जल परिषदेची बैठक पार पडली.पश्‍चिम खोऱ्यातील नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यास मान्यता देण्याबरोबर गोदावरी खोऱ्यातील एकात्मिक जल आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मान्यता दिली. तसेच गोदावरी खोऱ्यातील पाण्याचा उपयोग मराठवाड्यातील गावांनाही होण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश देऊन हा देशातील पहिला जल आराखडा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
राज्यातील सुमारे ५० टक्के क्षेत्रातील जल आराखड्यांचे कामे पूर्ण झाल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. कृष्णा, तापी, कोकण खोऱ्यातील एकात्मिक जल आराखड्यास येत्या मार्च २०१८ पर्यंत मान्यता देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.राज्य जल आराखडा मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करताना काही अडचणी उद्‌भवल्यास त्यासाठी दुरुस्ती प्रस्ताव, शासनाच्या जलनीती धोरणामध्ये बदल झाल्यास किंवा अधिनियमात बदल झाल्यास एकात्मिक जल आराखड्यातही बदल करण्यास व दुरुस्ती प्रस्ताव राज्य जल परिषदेला सादर करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *