youth-crime-and-diversionary-approaches-83fcd654496aa68f64b8ead94d8090ef

गुन्हेगारीत देशात उत्तर प्रदेश अव्वल !

देश

youth-crime-and-diversionary-approaches-83fcd654496aa68f64b8ead94d8090ef

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालामध्ये देशातील सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंद उत्तर प्रदेशात झाली. 2016 मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक (9.5 टक्के) गुन्हे नोंदवण्यात आले. त्यानंतर मध्य प्रदेश (8.9 टक्के), महाराष्ट्र (8.8 टक्के) आणि केरळ (8.7 टक्के) या राज्यांचा क्रमांक लागतो.
देशातील सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंदही उत्तर प्रदेशात झाली आहे. 2016 मधील एकूण गुन्ह्य़ांची संख्या 48 लाख 31 हजार 515 इतकी आहे. 2015 मध्ये हीच संख्या 47 लाख 10 हजार 676 इतकी होती. म्हणजे गुन्ह्य़ांमध्ये 2.6 टक्क्यांनी वाढ झाली. त्यापैकी उत्तर प्रदेशात 2 लाख 82 हजार गुन्ह्य़ांची नोंद आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळचा नंबर आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा-
महाराष्ट्रात गुन्ह्य़ांची संख्या 2015 मधील 4 लाख 23 हजारांवरून 2016 मध्ये 4 लाख 30 हजारांवर गेली. पण तरीसुद्धा महाराष्ट्रातील प्रमाण देशाच्या सरासरीपेक्षा कमी म्हणजे 217 इतके आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *