Bharadi_devi_mandir_in_aanganechi_wadi

कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख जाहीर

कोकण

Bharadi_devi_mandir_in_aanganechi_wadi

भराडी देवी जत्रोत्सवाच्या तारीखे कडे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते.नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेली आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या २०१८ वार्षिक यात्रोत्सवाची तारीख जाहीर झाली आहे. श्री देवी भराडीची यात्रा शनिवार २७ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे.
यात्रेची तारीख निश्चित करण्यासाठी प्रथे प्रमाणे पारध करण्यात आली. त्यानंतर देवीला प्रसाद लावण्यात आला. शुक्रवारी (१ डिसेंबर) सकाळी देवीने दिलेल्या आदेशानुसार जत्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीची यात्रा शनिवार २७ जानेवारी २०१८ रोजी होणार आहे. या यात्रेला लाखोंच्या संख्येने भाविक येतात. खासकरुन मुंबईतून मोठया संख्येने भाविक देवीच्या दर्शनाला जातात.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *