ticket-counter-1464192744

रेल्वेच्या तात्काळ तिकिटांमध्ये नवे नियम लवकरच लागू

देश

ticket-counter-1464192744

रेल्वेच्या तात्काळ तिकिटांमध्ये नव्या नियमांना लवकरच लागू करण्यात येणार आहे.या संदर्भात रेल्वेकडून लवकरच आदेश निघणार आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या युनियनमार्फत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी देखील तात्काळ तिकिट असावं असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. या प्रस्तावामुळे आता सामान्यांसोबतच रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील फायदा होणार आहे. काही दिवसांपूर्वी ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशन आणि रेल्वे बोर्डामध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. आता यानंतर रेल्वेतील ५६ हजार कर्मचारी तात्काळ तिकिट घेऊ शकतात. आतापर्यंत ही सुविधा फक्त सामान्य नागरिकांसाठी होती पण आता ही कर्मचाऱ्यांसाठी देखील खुली झाली आहे. तुर्तास ही सेवा जबलपूरमध्ये आहे.
तात्काळ तिकिटासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील पास घेऊन लांब रांगेत उभं राहावं लागणार आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांना त्याच वेळी तात्काळ तिकिटाचे पैसे द्यावे लागणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *