तर तुमचं ट्विटर अकाऊंट बंद होण्याची शक्यता

व्यापार

twitter2

सोशल मीडिया सध्या आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनलाय. कुणासाठी केवळ टाइम पास करण्याचं साधन तर कुणासाठी प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी सोशल मीडियाचा वापर गरजेचं झाले आहे. आजच्या परिस्थितीत लोकं व्यवसाय, त्यासंदर्भातील बोलणीदेखील सोशल मीडियाच्याच माध्यमातून करताना पाहायला मिळतात. त्यासोबतच एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. अनेकदा काही गोष्टी सोशल मीडियावर ट्रोल होतात. सोशल मीडियावर व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य असले तरी काहीजण याचा गैरवापर करतात. ट्रोल करताना अनेकदा आक्षेपार्ह शब्दही वापरले जातात.

यातच आता ट्विटर लवकरच यावर काही प्रमाणात आळा घालण्यासाठी नवा नियम घेऊन येतोय. १८ डिसेंबरपासून ट्विटरवर नव्या नियमांचा समावेश केला जाणार आहे.
तर अकाऊंट होईल बंद
अभद्र-अर्वाच्य भाषा आणि खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे अकाऊंट बंद होईल. साधारणतः टीका करताना किंवा एखाद्याची मस्करी करताना अयोग्य भाषेचा वापर केल्याचं पाहायला मिळते. Twitter च्या नवीन हेटफूल कंडक्ट पॉलिसीनुसार, ट्विटरवर जर कुणी अर्वाच्य भाषा किंवा एखाद्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर संबंधित व्यक्तीचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात येईल.
अकाऊंट बंद करण्यापूर्वी दिला जाणार इशारा
जर कुणाकडून नियमांचं उल्लंघन करण्यात आले तर ट्विटरकडून सुरुवातीला युझरला संबंधित ट्विट डिलीट करण्याची सूचना देण्यात येईल. मात्र यानंतर पुन्हा नियमांचं उल्लंघन झालंच तर ट्विटरकडून अकाऊंट बंद केले जाईल. यानंतर युझर तोपर्यंत ट्विटरचा वापर करू शकत नाही जोपर्यंत ट्विटरकडून त्याचे अकाऊंट पुन्हा ओपन केले जात नाही.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *