Cattle-Slaughter-Ban

गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा देण्याची धर्म संसदेची मागणी

देश

Cattle-Slaughter-Ban

गायीचे संरक्षण करणे आवश्यक असून तो हिंदूंचा कायदेशीर अधिकार आहे, असे धर्मसंसदेचे आयोजक असलेल्या विश्व हिंदू परिषदेकडून सांगण्यात आले.गायीला राष्ट्रीय पशूचा दर्जा देण्याची मागणी कर्नाटकमधील धर्म संसदेत करण्यात आली. याबद्दलचा ठरावदेखील धर्म संसदेसमोर मांडण्यात आला.
विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सहसचिव सुरेंद्र कुमार जैन यांनी गोरक्षकांवर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली. ‘गायींची तस्करी करणाऱ्या, गोमांसाची अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून गोरक्षकांना लक्ष्य केले जाते. त्यामुळेच गायीच्या संरक्षणासाठी तिला राष्ट्रीय पशूचा दर्जा देण्याची गरज आहे. गायीचे संरक्षण करण्याचा अधिकार हिंदूंना आहे. गोहत्येमुळे देशभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे गोहत्या थांबायला हव्यात. गोहत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हायला हवी,’ असे जैन यांनी म्हटले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *