800x480_176260d82ffae72c5d0d935c68ce773b

कोकण रेल्वे सुविधेला प्रवाशांचा ‘पारदर्शक’ प्रतिसाद

कोकण

800x480_176260d82ffae72c5d0d935c68ce773b

पर्यटकांना कोकणातील निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी मध्य रेल्वे मार्गावरील जनशताब्दी एक्स्प्रेसला व्हिस्टाडोम (काच असलेला पारदर्शक डबा) डबा जोडण्यात आला. १८ सप्टेंबर २०१७ पासून सुरू करण्यात आलेल्या या सुविधेला प्रवाशांनी ‘पारदर्शक’तेने प्रतिसाद दिला आहे. मुंबईतून जाताना डब्याच्या एकूण क्षमतेपेक्षा सरासरी ८७ टक्के प्रवाशांचा प्रतिसाद मिळाला आहे.
व्हिस्टाडोम डब्याची बांधणी चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटिग्रल कोच फॅक्टरी) करण्यात आली आहे. काचेचे छत असलेला हा डबा मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल करण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार १८ सप्टेंबरपासून दादर-मडगांव जनशताब्दीला डबा जोडण्यात आला. ४० आसने असलेल्या डब्यात काचेच्या मोठय़ा खिडक्या, १२ एलसीडी, एक फ्रिज आणि फ्रीजर, एक ओव्हन यासह प्रवाशांना सामान ठेवण्यासाठी आणि निसर्ग पाहण्यासाठी स्वतंत्र जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. पारदर्शक डब्यातील दादर ते मडगाव प्रवासासाठी दोन हजार २३५ तर रत्नागिरीपर्यंतच्या प्रवासासाठी एक हजार ४८० रुपये तिकीट दर आहेत.. आतापर्यंत एकूण ९३४ प्रवाशांनी विस्टाडोममधून प्रवास केल्याचे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *