Yashwant Hegde

आवळाई हायस्कुलचे शिक्षक श्री.बाळू हेगडे यांना पितृशोक

महाराष्ट्र

Yashwant Hegde

आटपाडी – आवळाई हायस्कुलचे शिक्षक श्री.बाळू हेगडे यांचे वडील श्री.यशवंत हेगडे यांचे रविवार दिनांक १२ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी वृद्धापकाळाने व अल्पशा आजाराने वयाच्या ८७ व्या वर्षी आवळाई येथील त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले. कै.श्री.यशवंत हेगडे यांच्या पश्चात ७ मुले व २ मुली,सुना,जावई,नातवंडे असा एकत्रित परिवार आहे.

सदर, अस्ती विसर्जन विधी मंगळवार दिनांक १४ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ८ वाजता आहे.

शिक्षक बाळु हेगडे यांनी २३व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन, २४वे महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन, २७वे महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात चौथा, ३२वे महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात व्दितीय, ४१वे महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

श्री.बाळू हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली बनलेल्या ‘पोलवरती चढण्याचे उपकरणा’ने जिल्हा, राज्य व राष्ट्रीय प्रदर्शनात ठसा उमटवून यश मिळवले. शिवाय,या उपकरणाची राष्ट्रीय ‘आयआरआयएस ‘मेन्टॉरिंग कॅम्पसाठी निवड झाली होती. जिल्हा ,राज्य आणि देशपातळीवर नावाजले गेलेल्या या उपकरणाची दखल घेत मुंबई येथे होणाऱ्या प्रदर्शनात निमंत्रण करण्यात आले होते. फक्त शाळा, संस्था,आवळाई व आटपाडीचेच नव्हे तर संपूर्ण सांगली जिल्ह्याचे यामुळे नावलौकिक झाले होते.

श्री.बाळू हेगडे यांच्या या यशामागे त्यांच्या वडिलांचा फार मोठा हात,पाठिंबा व आशीर्वाद होता. वडिलांनी त्यांच्यासाठी व त्यांच्या भावंडांसाठी घेतलेले कष्ट,परिश्रम,मेहनत यातूनच त्यांना प्रेरणा,जिद्द व कार्य करण्याची स्फूर्ती व ऊर्जा मिळाली होती. श्री.बाळू हेगडे हे आपल्या प्रत्येक यशासाठी त्यांच्या वडिलांचा आवर्जून उल्लेख करीत असत. आपल्या वडिलांनी केलेले कौतुक,त्यांच्याकडून मिळालेली दाद हि बाळू हेगडे यांच्यासाठी राष्ट्रीय पारितोषिकांहुन अधिक मोठी व महान आहे असे त्यांचे म्हणणे होते.

अवघ्या आयुष्यात ज्या माणसाने कोणालाही दुखविले नाही असे सरळ व प्रेमळ स्वभावाचे कै.यशवंत हेगडे यांच्या अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येने जनसमुदाय एकवटला होता.एक प्रेमळ स्वभावाचा माणूस आपल्यातून निघून गेला याचे दुःख संपूर्ण आवळाई व परिसरातील जनतेच्या मनामध्ये आहे.

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *