getimage

‘फेरीवाला हटाव’ मोहिमेमुळे दादर रेल्वे स्थानकालगतच्या कचऱ्यात घट

मुंबई

getimage

‘फेरीवाला हटाव’ मोहिमेमुळे रेल्वे स्थानकांलगतच्या परिसराने मोकळा श्वास घ्यायला सुरुवात केली असून स्थानक परिसरातील कचऱ्याचे प्रमाणही घटले आहे.दादर रेल्वे स्थानकालगतच्या पश्चिम परिसरातील फेरीवाल्यांना हटवल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण पाच टनाने कमी झाले आहे. दादर रेल्वे स्थानकालगतच्या परिसरात दररोज सुमारे २० टन कचरा निर्माण होतो.दादरमधील बाजारपेठ ही मुंबईतील मध्यवर्ती बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. दादरमध्ये केवळ उत्सव काळातच नव्हे तर वर्षभर भाजीपाला, फळे, विविध वस्तू, कपडे आदींच्या खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी असते. दादर रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाल्यांनी पथाऱ्या पसरल्यामुळे पादचाऱ्यांना चालताना तारेवरची कसरत करावी लागते. .दादर रेल्वे स्थानक परिसरातील ‘फेरीवाला हटाव’ मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसरांमधील फेरीवाले गायब झाले असून रेल्वे स्थानकांच्या आसपासचा परिसर फेरीवालामुक्त झाला आहे. त्यामुळे पादचारी सुखावले आहेत. फेरीवाले गायब झाल्यामुळे आता या परिसरात होणाऱ्या कचऱ्यावरही नियंत्रण आले आहे.
दादर रेल्वे स्थानकालगतच्या पश्चिम परिसरातून पालिका दररोज तब्बल २० टन कचरा उचलत होती. सकाळपासून हा भाग गजबजलेला असल्यामुळे दुपारनंतर कचरा वाहून नेण्याचे काम करावे लागत होते.या परिसरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यामध्ये सुमारे पाच टनाने घट झाली आहे. तसेच कचरा वाहून नेताना निर्माण होणारा फेरीवाल्यांचा अडथळाही दूर झाला आहे. परिणामी, कचरा गोळा करुन तो वाहून नेणाऱ्या कर्मचाऱ्यांना विनाअडथळा काम करणे शक्य होऊ लागले आहे. तसेच रस्ते आणि पदपथ मोकळे झाले असून वाहतुकीलाही मार्ग मोकळा झाला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *