new-2000-currency_7d31defc-dd41-11e6-84f6-f9b2ee092ea6

दिल्लीत पगार जास्त, तर मुंबईत सुट्ट्या -जागतिक बँकेचा अहवाल

देश

new-2000-currency_7d31defc-dd41-11e6-84f6-f9b2ee092ea6

सुट्ट्या आणि इतर सुविधांचा विचार केल्यास मुंबई काम करण्यासाठी उत्तम असल्याचे जागतिक बँकेच्या अहवालातून समोर आले आहे. मात्र पगाराचा विचार केल्यास दिल्ली मुंबईच्या पुढे आहे. दिल्लीत कर्मचाऱ्यांना मिळणारा सरासरी पगार मुंबईच्या तुलनेत जवळपास पन्नास टक्क्यांहून अधिक आहे.
व्यवसाय सुलभतेबद्दलचा हा अहवाल जागतिक बँकेने सादर केला आहे. जगभरातील प्रमुख शहरांमध्ये मिळणारी सरासरी पगाराची आकडेवारी आता प्रसिद्ध झाली आहे. दिल्लीत सुपर मार्केटमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला म्हणजेच कॅशिअरला दर महिन्याला १४ हजार पगार आहे, तर मुंबईत कॅशिअरला ८ हजार ६०० रूपये पगार आहे. दिल्लीतील कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार जास्त असला, तरी तेथील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्ट्यांचे प्रमाण कमी आहे. दिल्लीतील कर्मचाऱ्यांना वर्षाकाठी सरासरी १५ भरपगारी रजा मिळतात. तर मुंबईतील कर्मचाऱ्यांना २१ भरपगारी रजा मिळतात. दिल्लीतील कर्मचाऱ्यांना पगार जास्त असला तरी सुट्ट्यांचं प्रमाण मात्र, मुंबईच्या तुलनेत कमी आहे, मुंबई सुट्टयांच्या बाबतीत आघाडीवर आहे.मात्र तरीही मुंबईत मिळणाऱ्या भरपगारी रजांची संख्या ब्राझील आणि लंडनमधील कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भरपगारी रजांपेक्षा कमीच आहे.
ब्राझीलमधील कर्मचाऱ्यांना दरवर्षी २६, तर लंडनमधील कर्मचाऱ्यांना दरवर्षी २८ हक्काच्या रजा मिळतात. मुंबईतील कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार इतर विकसनशील देशांमधील शहरांमध्ये काम करणाऱ्यांपेक्षा कमीच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *